Thursday, December 13, 2018

महारष्ट्र स्टेट बोर्ड कल चाचणी २०१८-१९ मोबाईल द्वारे

महारष्ट्र स्टेट बोर्ड कल चाचणी २०१८-१९  मोबाईल द्वारे


नमस्कार,
यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून राज्य मंडळामार्फत, इ.१० वी च्या विद्यार्थ्यांची कलचाचणी व अभिक्षमता कसोटी मोबाईल अँप द्वारे घेण्यात येणार आहे.त्या दृष्टीने सर्व विभागीय मंडळांच्या वतीने जिल्हा व तालुका समन्वयक यांचे राज्यस्तरीय विभागीय प्रशिक्षण झाले    असून,तालुक्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी प्रशिक्षणे दि.१५-१२-२०१८ पर्यंत पूर्ण होतील.
कल चाचणी व अभिक्षमता कसोटी ह्या मानसशास्त्रीय कसोट्या आहेत.ह्या कसोट्यांचा शालेय विषयांच्या मार्कांशी संबंध नाही,ह्या मुळे विद्यार्थ्यास त्याचा कल कोणत्या क्षेत्रात आहे?तसेच त्याच्या क्षमता जाणून घेण्यास मदत होणार आहे.त्याच्या भावी आयुष्यातील करिअर ची दिशा स्पष्ट होण्यासाठी,अभ्यासक्रमाची निवड करण्यासाठी, कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा. त्या विद्यार्थ्यांकडे  कोणत्या क्षमता आहेत..हे ह्या कसोट्यांद्वारे समजण्यास निश्चितच सहकार्य होईल. 
 त्या दृष्टीने कसोट्यांचे शाळांमधून प्रशासकीय नियोजन करतांना काही महत्त्वाच्या बाबी:-
*शाळेतील कलचाचणी व अभिक्षमता कसोटीचा पासवर्ड कसा मिळवावा?*
१) शाळेत कलचाचणी व अभिक्षमता कसोटीसाठी प्रथम *www.mahasscboard.in* या वेबसाईटवर दि.१५डिसेंबर पासून आपल्या शाळेचा इंडेक्स क्रमांक टाकून लॉगइन करावे. 

२)लॉगइन झाल्यावर कलचाचणी व अभिक्षमता कसोटी घेण्यासाठी आपल्याला आपल्याशाळेसाठीचा पासवर्ड मिळेल.

३)मिळालेला पासवर्ड हा फक्त कलचाचणी व अभिक्षमताकसोटी साठीच असेल.

४) *www.mahacareermitra.in/school* या वेबसाईटवर जाऊन शाळेचा UDISE क्रमांक आणि मिळालेला पासवर्ड ने लॉगिन करावे, *पहिल्या लॉगिन च्या वेळी आपल्याला एकदाच पासवर्ड बदलता येईल.* पुन्हा पुन्हा ही सुविधा असणार नाही. त्यामुळे तो लक्षात ठेवावा, वहीत नोंद करून ठेवल्यास उत्तम. *मिळालेला अथवा बदललेला पासवर्ड अधिकृत शिक्षकांच्या शिवाय इतर कोणालाही देऊ नये.*

५) मोबाईल अँप वर,कलचाचणी सुरू करण्यापूर्वी,लॉगइन करतांनाआपल्या शाळेचा *यु-डायस क्रमांक व बोर्डाच्या वेबसाईट वरून मिळालेला किंवा आपण बदलला असेल तर बदललेला पासवर्ड* वापरावा.
६)मोबाईल ची स्क्रीन 5 इंचापेक्षा जास्त असावी.
----------------------------------------

*कालावधी*
१)शाळेत विद्यार्थ्यांची कलचाचणी व अभिक्षमता कसोटी,
दि.१८-१२-२०१८ ते दि.१७-१-२०१९ह्या कालावधीत असेल.

२) मोबाईल अँप वर,विद्यार्थ्यांचे लॉगइन केल्यावर,एका वेळी,एका विद्यार्थ्याची कलचाचणी व अभिक्षमता कसोटी दोन्हीही,एकाच वेळी पूर्ण करावे.

3)शाळेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यास,प्रशिक्षणार्थी शिक्षकांना,तालुक्यातील प्रशिक्षणानंतर आपल्या स्वतःच्या शाळेतील इतर शिक्षकांना देखील, शाळेतच दि.१५डिसेंबर पर्यंत प्रात्यक्षिक सराव डेमोअँप सह प्रशिक्षण देण्यास सांगावे.

४)आपल्यास डेमो अँप वर दि.१५तारखेपर्यंत सराव करता येईल.त्यानंतर डेमो अँप उपलब्ध नसेल.

५)दि.१८डिसेंबर २०१८ पासून,कलचाचणी सुरू होताना, महाकरिअर मित्र हेल्पलाईन सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असेल.
६)आपल्या शाळेतील इ.१० वी च्या सर्व नियमित,१७क्रमांकाचा फॉर्म भरलेले,खाजगी प्रविष्ट विद्यार्थ्यांची ही कसोटी घेतली जावी.



काळ चाचणी देण्याची प्रक्रिया साठी खालील माहिती पत्रक डाउनलोड करा 

कल  चाचणी डाउनलोड


व्हिडीओ बघण्यासाठी  खालील लिंक वर क्लिक करा ....
 

Share this

Dear Readers, I am a Teacher with 21st Century Skills and innovative ideas with command over the use of Technology in educational field. Here are my blogs in service to yo. It will be helpful for you to get the articles and ideas of your interest. Thanks for showing your interest to this site. Have a nice day! Regards: Ajaysing Patil

0 Comment to "महारष्ट्र स्टेट बोर्ड कल चाचणी २०१८-१९ मोबाईल द्वारे "

Post a Comment