Tuesday, September 29, 2020

Dr.M.S.Gosavi Sir's 85th Birthday

 


सर डॉ.एम. एस. गोसावी सर

अभिष्टचिंतन सोहळा 2020

गोखले एज्युकेशन सोसायटी मधील सर्व शिक्षक कवी बंधू भगिनी साठी सुवर्णसंधी...

🎙️🎙️🎙️🎙️🎙️

आपणास कळविताना आनंद होत आहे की आपल्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय सचिव सर डॉ. एम एस. गोसावी साहेब यांच्या *अभिष्टचिंतन सोहळा निमित्त एक सुंदर  ऑनलाइन कवी संमेलन दिनांक 27 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आलेले आहे . तरी आपल्या संस्थेतील सर्व झोन मधील माध्यमिक विभागातील सर्व कवींनी संमेलनात सहभाग घेण्यासाठी खाली दिलेल्या मार्गदर्शन नुसार व अटींवर निवेदिका मागवण्यात येत आहेत. तरी इच्छुकांनी सहभाग घ्यावा.

🌺🌸🏵️🌻🌼💐

 कवितेसाठी विषय 

1) सर डॉ.एम.एस.गोसावी सर यांचे जीवन कार्य

2) सर डॉ. एम. एस. गोसावी सर यांचे व्यक्तिमत्व

3) covid-19 च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मधील शिक्षणाची अवस्था

4) covid-19 च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मध्ये शिक्षणाचे नवीन स्वरूप.

💐🌼🌻🏵️🌸🌺

 कार्यक्रमाची वेळ आणि दिनांक 

दिनांक: 27 ऑक्टोबर 2020

वार: मंगळवार

वेळ: सकाळी 11.00

🌺🌸🏵️🌻🌼💐

 संमेलन ऑनलाईन "गूगल मीट" या ॲप्लिकेशनवर होणार आहे 

 तरी हे संमेलन युट्युब वर लाईव्ह प्रसारित करण्यात येणार आहे. 

🌺🌸🏵️🌻🌼💐

 सहभाग नोंदणी पूर्वी खालील दिलेल्या अटी विचारात घेऊनच सहभाग नोंदवावा. 

🎤 सहभागी होणारे कवी हे फक्त गोखले एज्युकेशन सोसायटी मधील सर्व झोन मधील फक्त माध्यमिक विभागातील शिक्षक किंवा  शिक्षिका असतील.

🎤 संमेलन ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला ऑनलाईन मिटींगचे आवश्यक ज्ञान असणे गरजेचे आहे.

🎤 ऑनलाइन मीटिंगसाठी आपल्याकडे आवश्यक असलेले उपकरणे तसेच उत्तम नेटवर्क आणि चांगल्या इंटरनेटची सेवा असणे गरजेचे आहे.

🎤 उत्तम दर्जाची कविता तसेच सादरीकरण सुद्धा  दर्जेदार असावे.

🎤 वरील दिलेल्या विषयांपैकी आपल्याला दोन कविता लिहायच्या आहेत.

🎤या दोन कवितांपैकी निवड झालेल्या दोन्ही कविता अथवा त्यापैकी एक कवितेचे आपल्याला सादरीकरण करायचे आहे.

🎤 याबद्दल आपल्याला सविस्तर कळविण्यात येईल.

🎤 कविता ही दोन ते तीन मिनिटा पेक्षा जास्त नसावी.

🎤 कवितेतील मजकूर हा कोणताही वादविवाद निर्माण करणारा अथवा जात धर्म पंथ तसेच इतर कोणाच्याही भावना दुखावणारा नसावा.

🎤 आपण पाठवलेल्या कवितांपैकी फक्त उत्तम दर्जाच्या 20 कवितांची निवड केली जाणार आहे.

🎤 निवड झालेल्या कवींना वैयक्तिक संपर्क करून कार्यक्रमासंदर्भात कळविण्यात येईल. तसेच वेबसाईटवर त्यांची यादी प्रसारित करण्यात येईल.

टीप: हा कार्यक्रम संस्थेचे आदरणीय सचिव सर डॉ. एम.एस. गोसावी सर यांच्या वाढदिवसानिमित्त असल्यामुळे कवितेतील मजकूर हा आनंदोत्सव साजरा करणारा असावा. थोडक्यात वेदनादायक परिस्थितीचे वर्णन करणे टाळावे.

💐🌼🌻🏵️🌸🌺

 ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी मार्गदर्शन 

🌼 ऑनलाइन फॉर्म व्यवस्थित भरून सबमिट करावा.

🌼 कवींनी आपला बायोडाटा पीडीएफ फॉरमॅटमध्येच अपलोड करावा. बायोडाटा मध्ये कविता लिहिण्याचा अनुभव आपल्याला मिळालेले पुरस्कार, एक कवी म्हणून आपली कामगिरी, आपण लिहिलेल्या प्रसिद्ध कविता, कवितासंग्रह इत्यादींची माहिती असावी.

🌼 कवींनी आपल्या दोन्ही कविता एकाच कागदावर अथवा मायक्रोसोफ्ट वर्ड मध्ये टाईप करून त्याची पीडीएफ फाईल बनवूनच अपलोड करावी.

🌼एक पीडीएफ फाईल बायोडेटा ची असेल आणि दुसरी पीडीएफ फाईल मध्ये आपल्या दोन कविता असतील.

🌼 पीडीएफ फाईल मधील दिलेला मजकूर हा वाचण्यायोग्य सुस्पष्ट असावा.

🌼आपली माहिती ऑनलाईन पाठवण्याचा शेवटचा दिनांक: 23 ऑक्टोबर 2020 सकाळी: 10.00 पर्यंत. यानंतर आपल्याला सहभाग घेता येणार नाही.

🌼 फॉर्म सबमिट झाल्यावर वेबसाईटवर त्याखाली दिलेल्या यादीत आपले नाव चेक करून घ्यावे.

🌼 फॉर्म एकाच वेळेस सबमिट करायचा आहे.

🌼फॉर्म भरल्यावर यादीत नाव दिसत नसल्यास आपले पेज रिफ्रेश करावे लगेच नाव दिसेल.

🌼🌺🌸🏵️🌻💐

 तरी आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला सहभाग नोंदवावा ही विनंती.

http://functionalenglishclub.blogspot.com/2020/09/drmsgosavi-sirs-85th-birthday.html


आपल्याला काही शंका असल्यास

श्री. खैरनार जे. एन.

(+919325233287)

श्री. पाटील ए.आर. 

(+919403545204)


 कार्यक्रम मार्गदर्शक 

 समन्वयक :

श्री. विनोद देशपांडे


सूचना : नाव नोंदणी झाल्यानंतर कार्यक्रमासाठी आपली  निवड झाल्याची सूचना आपल्याला  वैक्तिक फोनवरून देण्यात येईल


कवींनी नाव नोंदणी साठी खालील फॉर्म भरा 

👇


नोंदणी झाल्यावर आपले नाव खालील लिस्ट मध्ये बघा 


नाव नोंदणी झालेली कवींची लिस्ट 


मार्गदर्शक 
श्री . विनोद देशपांडे 

Share this

Dear Readers, I am a Teacher with 21st Century Skills and innovative ideas with command over the use of Technology in educational field. Here are my blogs in service to yo. It will be helpful for you to get the articles and ideas of your interest. Thanks for showing your interest to this site. Have a nice day! Regards: Ajaysing Patil

0 Comment to "Dr.M.S.Gosavi Sir's 85th Birthday"

Post a Comment