सर डॉ.एम. एस. गोसावी सर
अभिष्टचिंतन सोहळा 2020
गोखले एज्युकेशन सोसायटी मधील सर्व शिक्षक कवी बंधू भगिनी साठी सुवर्णसंधी...
🎙️🎙️🎙️🎙️🎙️
आपणास कळविताना आनंद होत आहे की आपल्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय सचिव सर डॉ. एम एस. गोसावी साहेब यांच्या *अभिष्टचिंतन सोहळा निमित्त एक सुंदर ऑनलाइन कवी संमेलन दिनांक 27 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आलेले आहे . तरी आपल्या संस्थेतील सर्व झोन मधील माध्यमिक विभागातील सर्व कवींनी संमेलनात सहभाग घेण्यासाठी खाली दिलेल्या मार्गदर्शन नुसार व अटींवर निवेदिका मागवण्यात येत आहेत. तरी इच्छुकांनी सहभाग घ्यावा.
🌺🌸🏵️🌻🌼💐
कवितेसाठी विषय
1) सर डॉ.एम.एस.गोसावी सर यांचे जीवन कार्य
2) सर डॉ. एम. एस. गोसावी सर यांचे व्यक्तिमत्व
3) covid-19 च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मधील शिक्षणाची अवस्था
4) covid-19 च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मध्ये शिक्षणाचे नवीन स्वरूप.
💐🌼🌻🏵️🌸🌺
कार्यक्रमाची वेळ आणि दिनांक
दिनांक: 27 ऑक्टोबर 2020
वार: मंगळवार
वेळ: सकाळी 11.00
🌺🌸🏵️🌻🌼💐
संमेलन ऑनलाईन "गूगल मीट" या ॲप्लिकेशनवर होणार आहे
तरी हे संमेलन युट्युब वर लाईव्ह प्रसारित करण्यात येणार आहे.
🌺🌸🏵️🌻🌼💐
सहभाग नोंदणी पूर्वी खालील दिलेल्या अटी विचारात घेऊनच सहभाग नोंदवावा.
🎤 सहभागी होणारे कवी हे फक्त गोखले एज्युकेशन सोसायटी मधील सर्व झोन मधील फक्त माध्यमिक विभागातील शिक्षक किंवा शिक्षिका असतील.
🎤 संमेलन ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला ऑनलाईन मिटींगचे आवश्यक ज्ञान असणे गरजेचे आहे.
🎤 ऑनलाइन मीटिंगसाठी आपल्याकडे आवश्यक असलेले उपकरणे तसेच उत्तम नेटवर्क आणि चांगल्या इंटरनेटची सेवा असणे गरजेचे आहे.
🎤 उत्तम दर्जाची कविता तसेच सादरीकरण सुद्धा दर्जेदार असावे.
🎤 वरील दिलेल्या विषयांपैकी आपल्याला दोन कविता लिहायच्या आहेत.
🎤या दोन कवितांपैकी निवड झालेल्या दोन्ही कविता अथवा त्यापैकी एक कवितेचे आपल्याला सादरीकरण करायचे आहे.
🎤 याबद्दल आपल्याला सविस्तर कळविण्यात येईल.
🎤 कविता ही दोन ते तीन मिनिटा पेक्षा जास्त नसावी.
🎤 कवितेतील मजकूर हा कोणताही वादविवाद निर्माण करणारा अथवा जात धर्म पंथ तसेच इतर कोणाच्याही भावना दुखावणारा नसावा.
🎤 आपण पाठवलेल्या कवितांपैकी फक्त उत्तम दर्जाच्या 20 कवितांची निवड केली जाणार आहे.
🎤 निवड झालेल्या कवींना वैयक्तिक संपर्क करून कार्यक्रमासंदर्भात कळविण्यात येईल. तसेच वेबसाईटवर त्यांची यादी प्रसारित करण्यात येईल.
टीप: हा कार्यक्रम संस्थेचे आदरणीय सचिव सर डॉ. एम.एस. गोसावी सर यांच्या वाढदिवसानिमित्त असल्यामुळे कवितेतील मजकूर हा आनंदोत्सव साजरा करणारा असावा. थोडक्यात वेदनादायक परिस्थितीचे वर्णन करणे टाळावे.
💐🌼🌻🏵️🌸🌺
ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी मार्गदर्शन
🌼 ऑनलाइन फॉर्म व्यवस्थित भरून सबमिट करावा.
🌼 कवींनी आपला बायोडाटा पीडीएफ फॉरमॅटमध्येच अपलोड करावा. बायोडाटा मध्ये कविता लिहिण्याचा अनुभव आपल्याला मिळालेले पुरस्कार, एक कवी म्हणून आपली कामगिरी, आपण लिहिलेल्या प्रसिद्ध कविता, कवितासंग्रह इत्यादींची माहिती असावी.
🌼 कवींनी आपल्या दोन्ही कविता एकाच कागदावर अथवा मायक्रोसोफ्ट वर्ड मध्ये टाईप करून त्याची पीडीएफ फाईल बनवूनच अपलोड करावी.
🌼एक पीडीएफ फाईल बायोडेटा ची असेल आणि दुसरी पीडीएफ फाईल मध्ये आपल्या दोन कविता असतील.
🌼 पीडीएफ फाईल मधील दिलेला मजकूर हा वाचण्यायोग्य सुस्पष्ट असावा.
🌼आपली माहिती ऑनलाईन पाठवण्याचा शेवटचा दिनांक: 23 ऑक्टोबर 2020 सकाळी: 10.00 पर्यंत. यानंतर आपल्याला सहभाग घेता येणार नाही.
🌼 फॉर्म सबमिट झाल्यावर वेबसाईटवर त्याखाली दिलेल्या यादीत आपले नाव चेक करून घ्यावे.
🌼 फॉर्म एकाच वेळेस सबमिट करायचा आहे.
🌼फॉर्म भरल्यावर यादीत नाव दिसत नसल्यास आपले पेज रिफ्रेश करावे लगेच नाव दिसेल.
🌼🌺🌸🏵️🌻💐
तरी आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला सहभाग नोंदवावा ही विनंती.
http://functionalenglishclub.blogspot.com/2020/09/drmsgosavi-sirs-85th-birthday.html
आपल्याला काही शंका असल्यास
श्री. खैरनार जे. एन.
(+919325233287)
श्री. पाटील ए.आर.
(+919403545204)
कार्यक्रम मार्गदर्शक
समन्वयक :
श्री. विनोद देशपांडे
सूचना : नाव नोंदणी झाल्यानंतर कार्यक्रमासाठी आपली निवड झाल्याची सूचना आपल्याला वैक्तिक फोनवरून देण्यात येईल
कवींनी नाव नोंदणी साठी खालील फॉर्म भरा
👇
नोंदणी झाल्यावर आपले नाव खालील लिस्ट मध्ये बघा
No comments:
Post a Comment