Friday, January 8, 2021

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020
मतदान केंद्राध्यक्षांसाठी महत्वाच्या सुचना

साहित्य वितरण
प्रत्येक ग्रामपंचायत निहाय वितरणाचा टेबल लावलेला असेल तेथुन आपले निवडणूक निर्णय अधिकारी व नियुक्त केलेल्या कर्मचारी यांचेकडून साहित्य ताब्यात घ्यावे,
साहित्य ताब्यात घेतल्यावर

1) EVM :

*आपणास राज्य निवडणूक आयोगाचे EVM यंत्र देण्यात येणार आहे.

*आपणास देण्यात आलेले EVM आपणास नियुक्त केलेल्या ग्रामपंचायतीतील प्रभागाच्या
मतदान केंद्राचे असल्याची खात्री करा.
*बॅलेट युनिटला दोन्ही बाजूला सिल आहे का? Sliding Swith 1 किंवा 2 वर आहे का?
*उमेदवाराच्या नावासमोरील बटनावयतिरिक्त इतर बटने बंद आहेत का? ते तपासणे,
*कंट्रोल युनिटला Battery Section सील आहे का? ते तपासणे.
*Mock Poll करताना उमेदवारांची संख्या व निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या व्यवस्थीत सेट केली आहे का? ते तपासावे. Mock Poll किंवा चाचणी मतदान करुन पहावे ते केल्यानंतरच केंद्रावर जायचे त्याशिवाय कणीही केंद्रावर जाऊ नये.

2) महत्वाचे साहित्य तपासावे :.
यात महत्वाच्या साहित्याची एक प्लॅस्टीक पिशवी आपणास दिली आहे. त्या खालील साहित्य मिळाले का? याबाबत खात्री करावी.

1) मतदार यादीच्या प्रती.
2) मतदार नोंदवही
3) स्पेशल टॅग 
4) मतदार स्लीप
5) मार्कर पेन
6) प्रदत्त मतपत्रिका
7) मेटल सिल
8) पेपर सिल किंवा कागदी मोहर,
9) बाण फुलोचा शिक्का
10) ए बी सी डी पट्टो सिल 
11) नमुना मतपत्रिका
12) आव्हानीत मतांसाठी पावतो पुस्तक
3) इतर साहित्य :- सर्व प्रकारचे फॉर्म्स पाकीटे मिळालीत का ? याची खात्री करावी व तसे प्रमाणपत्र घावे. त्या नंतर नेमून दिलेल्या बस मध्ये आपल्या टीमसह पोलीस कर्मचारी यांनी जावे. 

B) मतदान केंद्रावर गेल्यावर,
1) मतदान केंद्राचा Set.up उभारणे:
उचित पध्दतीने मतदान केंद्र तयार करा. सर्व प्रकारचे बोर्ड लावणे, मतदान कक्ष इ. ची उभारणी करणे, बाहेर नमुना मतपत्रिका लावणे, 100 मीटर व 200 मीटर च्या चुन्याच्या खुणा आखणे इ.कामे आटोपावीत.
2) प्रदत्त मतपत्रिका तयार करणे:
प्रदत्त मतपत्रिकेच्या मागील बाजूस केंद्राध्यक्षाने स्वाक्षरी करणे.
3) मॉकपोल किंवा चाचणी मतदान करणे : EVM चे Mock Poll करुन पाहणे.

C) मतदानाच्या दिवशी
सकाळी 6,30 वाजता मतदानाची तयारी सुरु करावयाची आहे. 06.45 वाजेपर्यंत उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांची वाट पहावी. या वेळेपावेतो ते न आल्यास, आपली कार्यवाही सुरु करावी.
*मतदान कक्षात ग्रामपंचायत निवडणूकीसाठीचे बॅलेट युनिट ठेवावेत त्याचे कंट्रोल युनिट मतदान अधिकारी क्र.3 यांचेकडेस राहील.
*मॉकपोल करुन दाखवावे.
*मशीन बंद करावे.
*CU चा Result Section प्रथमतः पेपर सिलने सिल करावा. त्यापुर्वी पेपर सिलचा नंबर कोणाला लिहावयाचा असल्यास तो लिहू द्यावा. त्यानंतर शेजारी केंद्राध्यक्षाने स्वत:ची दिनांकित स्वाक्षरी करावी व उपस्थित उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या स्वाक्षन्या घ्याव्यात. यंत्राचे कंट्रोल युनिट स्वतंत्ररित्या सिल करावे लागतील. सिलनंतर नंबर वरच्या बाजुने येईल याची दक्षता घ्यावी. हा नंबर आपणही लिहून घ्यावा. तो आपणास नोंदविलेल्या मतांचा हिशोब(नमुना व्ही.एम.3) यात नमुद करावयाचा आहे. 
*स्पेशल टॅगचे सिल :- स्पेशल टॅगच्या नंबर शेजारी केंद्राध्यक्ष यांनी दिनांकीत स्वाक्षरी करावी. व उपस्थित उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्याही स्वाक्षन्या घ्याव्यात. त्यांना नंबर लिहावयाचा असल्यास लिहू द्यावा. आपणही त्याची नोंद नमुना व्ही.एम.3 मध्ये घ्यावी, यानंतर दोन्याच्या सहाय्याने सहा गाठीचे सिल त्याला करावे. त्यानंतर Result चे झाकण बंद करावे. कंट्रोल युनिट बंद केल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत सिल करु नये.
* पट्टी सिल (A,B.C.D.Seal) :- यावरही नंबरच्या शेजारी सर्व स्वाक्षऱ्या करायला विसरु नये. Close बटनाच्या खालुन व्यवस्थीतपणे सिल करावे.
*झाकण सिल करणे :- Address Tag ने Result Section Seal करावा.

4) मतदान प्रक्रीया सुरुकरण्यापूर्वी केंद्राध्यक्षाचे कार्य :
1) मतदान नोंदवही व मतदार यादी उपस्थित प्रतिनिधींना दाखविणे :- मतदार नोंदवही व मतदार यादीत काहीही खुणा नाहीत हे सर्वांना दाखविणे.
2) घोषणापत्र करणे व गुप्ततेची शपथ देणे :- मतदान सुरु करण्यापुर्वीचे घोषणापत्र करणे व उपस्थितांना मतदान गुप्तता बाळगण्याची शपथ द्यावी.
3) मतदान सुरु करणे :- ठिक सकाळी 07.30 वाजता मतदान सुरु करावे.
मतदानातील आव्हाने :-
1) मतदाराने मतदान करण्यास नकार देणे : मतदाराची ओळख पटवुन झाल्यावर, मतदान नोंदवहीत त्याची नोंद केल्यावर त्याने स्वाक्षरीही केली, बोटाला मार्कपन झाले व त्याने मतदान करायचे नाही असे सांगितले तर त्यास जबरदस्ती करु नये. तसा शेरा मतदार नोंदवहीच्या अभिप्राय रकान्यात घ्यावा व संबंधीत मतदाराची स्वाक्षरी तेथे घेऊन स्वत:ची स्वाक्षरी केंद्राध्यक्षाने करावी. CU बंद न करता पुढील मतदारास ठरलेल्या कार्यपध्दीने मतदान करु द्यावे.
2) मतदारास मतदान करण्याचे नाकारणे :-मतदार नोंदवहीत स्वाक्षरी करत नसला किंवा आपली मतदानाची पध्दत पाळत नसला तर त्यास मतदान करु देऊ नये व तसा शेरा अभिप्राय या रकान्यात घ्यावा. व त्याखाली केंद्राध्यक्षाने पुर्ण सही करावी.
3) प्रदत्त मत :-
मतदान अधिकारी क्र.1 च्या असे लक्षात आले की, आलेल्या मतदाराच्या नावावर कुणी अन्य व्यक्ती मतदान करुन गेला आहे. तर अशा मतदाराची नोंद मतदान अधिकारी क्र. 2 यास मतदार नोंदवहीत करु नये असे सांगुन त्यास प्रदत्त मतदाराची यादी या नमुन्यात त्याची नोंद करणेस सांगावे. त्याप्रमाणे मतदान अधिकारी क्र. 2 याची नोंद त्या यादीत घेईल. तेथेच मतदाराची स्वाक्षरी घेईन. त्याच्या बोटाला शाई लावेल व त्यास प्रदत्त मतपत्रिका देईल. त्याला मतदार स्लीप देण्याची गरज नाही. या मतदाराने बाणफुलीच्या शिक्क्याने प्रदत्त मतपत्रिकेवर मतदान करावे त्यास मशिनवर मतदान करता येणार नाही.
4) आव्हानीत मते :-
उपस्थित एखाद्या मतदान प्रतिनिधीने मतदाराच्या ओळखीस आव्हान दिल्यास त्याच्याकडून र.रु. 2/- मात्र इतकी अनामत रक्कम घ्यावी. मतदारची सखोल चौकशी करावी. सदर मतदार खरा असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यास मतदान करु द्यावे व र.रु. 2/- हे जप्त करावेत. तथापी, मतदार खरा नसल्याचे निष्पन्न झाल्यास त्यास पोलिसांच्या स्वाधीन करावे व लेखी तक्रार पोलिसात द्यावी. संबंधित योग्य त्या नमुन्यात नोंदी घ्याव्यात.
5) मतदान प्रक्रिया बंद करणे :-
सायंकाळी 05.30 वाजता मतदान केंद्राचे कंपाऊंड बंद करावे. मतदान केंद्रासमोर रांगेत जेवढे मतदार आहेत त्यांना रांगेतील शेवटच्या मतदारास नंबर 1 ची चिट्ठी द्यावी. त्यापुढील मतदारास नंबर 2 ची चिठ्ठी द्यावी असे मागुन पुढे नंबराच्या चिटठ्ठया वाटाव्यात व 1 नंबरची चिठ्ठी येईपर्यत मतदान करुन घ्यावे.
यानंतर Close बटनावरील कॅप काढून CU वरील Close बटन दाबावे व येणारा Total म्हणजे मशीन वर झालेले मतदान याचा आकडा नमुना व्ही.एम.3 मध्ये घ्यावा व लिहून ठेवावा. नंतर Ballot बटन दाबुन आता Display Section वर no येते हे उपस्थितांना दाखवुन द्यावे. म्हणजेच Close केल्यानंतर मतदान करता येत नाही हे सर्वांना दखवावे. CU मशीन मागून बंद करावे. BU व CU पेटयांमध्ये ठेवुन पेटया Seal कराव्यात. CU च्या हॅण्डलला
 1) नोंदविलेलया मतांचा हिशोब ( नमुना व्हीएम-3) चे सिलबंद पाकीट, 
2) टक्केवारीचे सिलबंद पाकिट 
3) मतदान केंद्राध्यक्षाच्या डायरीचे सिलबंद पाकीट व 
4) केंद्राध्यक्षाच्या प्रतिज्ञापत्राचे सिलबंद पाकीट हे एकत्रितरित्या बांधावेत.
उपस्थित उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना नमुना व्हीएम-3 च्या प्रती द्याव्यात, 6) पाकीटे सिल करणे.
*सर्व संविधानिक पाकीटे सिल करावीत ती सर्व पाकीटे एका मोठया पाकीटात टाकून ते सिल करु नये.
*असंविधानिक पाकीटातील फक्त एकच पाकीट सिल करावे, ते म्हणजे आव्हानित मतांची यादी.
*वरील पाकीटे सिल करतांना रिकामे पाकीट पाठवू नये. माहिती निरंक असल्यास, त्यात कोऱ्या कागदावर निरंक असे लिहून तो कागद पाकीटात टाकून मग पाकीट सिल करावे.

7) साहित्य जमा करणे :-
1) E:V.M. जमा करणे व प्रथम सुटे अहवाल देणे :- CU व BU जमा करणेसोबत अ)नोंदविलेल्या मतांचा हिशोब (नमुना व्ही.एम.3) ची प्रत, (१ खुली व सील केलेली प्रत)
ब) मतांच्या टक्केवारीचा कागद.
क) मतदान केंद्राध्यक्षाची डायरी (१ खुली व सील केलेली प्रत ) 
ड) केंद्राध्यक्षांनी करावयाचे घोषणापत्रे यांचा लिफाफा (फक्त १ सीलबंद प्रत )

2) पाकिटे जमा करणे :-
अ) संविधानिक पाकीटांचा लिफाफा जमा करणे
1)-मतदान यादीच्या चिन्हांकित प्रती
2) मतदान नोदंवही
3) वापरलेल्या मतदार चिठ्ठया
4) उपयोगात आलेल्या प्रदत्त मतपत्रिका व प्रदत्त मतांची यादी.
5) न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका 

ब) असंविधानिक पाकीटांचा लिफाफा जमा करणे.
1) मतदान यादीच्या इतर प्रती
2) मतदान प्रतिनिधीच्या नेमणूक पत्र
3) मतदान केंद्रावरील हजेरीपट हजेरीपत्रक/पावती
4) आक्षेपीत मतांची यादी
5) अंध/अपंग मतदारांची यादी व त्याचे सोबत्याचे प्रतिज्ञापत्र
6).मतदाराने वयाबाबत केलेल्या प्रतिज्ञापन
7) आक्षेप फिचे पावती पुस्तक व जप्त केलेली रोख रक्कम लिफाफा
8) न वापरलेल्या व खराब झालेल्या कागदी मोहरा 
9) न वापरलेल्या मतदार चिठ्ठया व काऊंटर्स
10) न वापरलेल्या व खराब झालेली विशेष टॅग्ज

3) इतर साहित्य :- मेटल सिल व बाणफुलीचा शिक्का जमा करणे व इतर साहित्य जमा करणे.

साहित्य जमा करण्यासाठी

मतदान केंद्राचे ज्या टेबल क्रमांक वरुन दि. 14/01/2020 रोजी साहित्य वाटप करण्यात येईल त्यानुसार मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर दि. 15/01/2020 रोजी सायंकाळी 05.30 वाजेनंतर त्याच क्रमाने टेबलनिहाय साहित्य स्विकारण्यात येईल. त्याच टेबलनिहाय ग्रामपंचायतीच्या ईव्हीएम मशीन व त्यावरील सर्व पाकिटे व ग्रामपंचायतीच्या असंविधानिक पाकीटे जमा करणे, उर्वरीत सर्व ग्रामपंचायतीचे इतर साहित्य मेटल सिल व बाणफुलीचा शिकक्यासह स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच ठिकाणी इतर साहित्य जमा करावे.

COLLECTION PLAN
टेबल 
1. CU व BU सोबत पाकीट खुले
a. केंद्राध्यक्ष दैनंदिनी
b. नोंदविलेल्या मतांचा हिशेब
c. मतदानाची टक्केवारी
2. संविधानिक असंविधानिक सिल न केलेले पाकीटे व इतर साहीत्य
आपल्या क्षेत्रिय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या परवानगी शिवाय जावु नये.जाहीर केल्यानंतरच जाणे.
मतदान अधिकारी क्र. 1 यांची कामे,

1) मतदान सुरु करण्यापुर्वी मतदार यादीवर कोणत्याही खुणा नाहीत हे उपस्थितांना दाखविणे. 
2) राज्य निवडणूक आयोगाने दिलेले मतदारांची ओळख पटविण्यासाठी नमुद केलेल्या 17 पुराव्यांपैकी पुरावा घेवुन मतदाराची ओळख पटविण्यात यावी. पुरावा बघणे आवश्यक आहे.
3) ओळख पटविल्यानंतर त्याचा मतदार यादीतील अनुक्रमांक मोठयाने मतदान अधिकारी क्र.2 यास सांगणे व मतदार यादीवर त्याच्या नावावर खाली नमुद केले प्रमाणे पेनने खुण करणे.
4) मतदाराच्या पुढील प्रसंगी त्यास केंद्राध्यक्षाकडे पाठवावे.
अ) मतदारास एखाद्या मतदान प्रतिनिधीने ओळखीबद्दल आव्हान दिल्यास
ब) प्रदत्त मत उद्भवल्यास
क) अंध/अपंग इसमास सोबत्याच्या सहाय्याने मतदान करावयाचे असल्यास
ड) उमेदवाराच्या वयासंबंधी वाद उद्भवल्यास
5) मतदार यादीतील नावांमध्ये काही तांत्रिक चुका किंवा हस्तदोषातील चुका किंवा नावातील चुका याकरीता मतदारास मतदान करण्यापासुन वंचित ठेऊ नये

मतदान अधिकारी क्र. 2 यांची कामे.

1) मतदान सुरु करण्यापुर्वी मतदार नोंदवही कोरी असल्याचे उपस्थितांना दाखविणे.
2) मतदान सुरु झाल्यावर मतदान अधिकारी क्र.1 यांनी मतदाराच अनुक्रमांक मोठयाने सांगितल्यावर मतदार नोंदवहीत नोंदवावा.
3) मतदार आल्यावर प्रथम त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर मार्कर पेनच्या सहाय्याने शाई लावावी. शाई लावतांना मार्कर पेन दाबुन चालवावा व 3 ते 4 वेळा त्यावर गिरवावे. 
4) मतदाराची मतदार नोंदवहीत स्थाक्षरी/अंगठा घ्यावा. 
5) मतदारास मतदान स्लीप द्यावी
6) मतदान अधिकारी क्र. 3 कडे मतदारांना मतदान नोंदवहीत नोंद घेतलेल्या क्रमांकानेच पाठवावे. नंतर मतदार, मतदान अधिकारी क्र.3 कडे मतदान स्लीप देऊन मत कक्ष मध्ये जाऊन मतदान करेल. त्यानंतर मतदार मतदान करुन मग बाहेर जाईल. 
7) मतदान संपल्यावर मतदार नोंदवही बंद करणे :- मतदान संपल्यावर शेवटच्या मतदाराची नोंद मतदार नोंदवहीत झाल्यावर ती बंद करावयाची आहे. त्यासाठी शेवटच्या नोंदीनंतर आडवी रेघ मारावी व मतदार नोंदवही बंद यानंतर एकही मतदार मतदानासाठी शिल्लक नाही" असा शेरा घ्यावा व त्याखाली आपली, केंद्राध्यक्षाची दिनांकित स्वाक्षरी करावी व उपस्थित उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्याही स्वाक्षन्या घ्याव्यात.

मतदान अधिकारी क्र.3 याची कामे

1) तुमच्या ताब्यात सर्वात महत्वाचे साहीत्य म्हणजेच ग्रामपंचायत निवडणूकीचे Control Unit आहे. 
2) मतदार मतदान स्लिप घेऊन आल्यावर त्याच्या बोटाला शाई लावली आहे का? याची खात्री करावी.
3) मतदारास एका वेळी एक याप्रमाणेच मतदान कक्षात पाठवावे,
4) मतदारास Serial Number प्रमाणेच मतदान करण्यास पाठवावे.
5) मतदार स्लीप जमा करुन घ्यावी व तुम्हाला जो तार दिला आहे त्यात उलटी खोचावी. इतरत्र कुठेही मतदार स्लीप ठेऊ नये. 50 मतदार स्लीप जमा झाल्या की त्यांचा गठ्ठा करुन त्यास रबर बँड लावावे. मतदार स्लीप हा कायदेशीर दस्तऐवज असल्याने व संविधानिक पाकीटात सिलबंद करावयाचे असल्याने ती स्लीप इतरत्र जाता कामा नये. 

संपर्क करीता महत्वाचे दुरध्वनी क्र.

1) तहसिलदार निफाड - 
9423936200
2) निवासी नायब तहसिलदार - 
8378981796 
3) तहसिल कार्यालय निफाड -
02550-241024 
4) शरद घाटगे, महसूल सहाय्यक- 
9860026514 
5) पोलिस निरिक्षक, निफाड - 
9049231740 
6) पोलिस निरिक्षक, ओझर - 
8888745745 
7) पोलिस निरिक्षक, पिंपळगांव ब.- 
9665351111 
8) सहा.पोलिस निरिक्षक, लासलगांव - 
9922276667 
9) सहा.पोलिस निरिक्षक, सायखेडा- 
9766628555

निडणुकीच्या कामासाठी हार्दिक शुभेच्छा!
आपला दिवस चांगला जाओ.

Share this

"Welcome to My Corner of the Digital Classroom! As a 21st-century educator with a passion for innovation and technology, I'm thrilled to share my expertise with you through this blog. Here, you'll discover a treasure trove of articles, ideas, and insights that will inspire and empower you to take your learning journey to the next level. Whether you're a fellow educator, a student, or simply a curious mind, I invite you to explore my blog and uncover the resources that resonate with you. My goal is to make learning accessible, engaging, and fun, and I'm honored to have you join me on this adventure. Thanks for stopping by, and I wish you a wonderful day filled with discovery and growth! Best regards, Ajaysing Patil"

0 Comment to "ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020"

Post a Comment